LIVE STREAM

AmravatiLatest News

दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिवसानिमित्त विभागीय आयुक्तालयात शपथ कार्यक्रम

अमरावती : भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 21 मे रोजी ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’साजरा केला जातो. यानिमित आज विभागीय आयुक्त कार्यालयात अपर आयुक्त रामदास सिध्दभट्टी यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची अधिकारी-कर्मचाऱ्यांना शपथ दिली.  

दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा यावेळी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली. यावेळी अपर आयुक्त सूरज वाघमारे, उपायुक्त राजीव फडके, तहसीलदार प्रज्ञा काकडे, नायब तहसीलदार श्यामसुंदर देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!