AmravatiLatest NewsLocal News
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना मनपातर्फे विनम्र अभिवादन
बुधवार दिनांक २१ मे,२०२५ रोजी अमरावती महानगरपालिकेमध्ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसा निमित्य दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख यांच्या हस्ते राजीव गांधी यांच्या प्रतिमेस हारार्पण करुन विनम्र अभिवादन महानगरपालिका कॉन्फरन्स हॉल येथे सकाळी ११.०० वाजता करण्यात आले. यावेळी अधिकारी व कर्मचा-यांनी दोन मिनिटे मौन पाळून श्रध्दांजली देण्यात आली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, मुख्यलेखापरिक्षक श्यामसुंदर देव, मुख्यलेखाधिकारी दत्तात्रय फिस्के, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, शिवा फुटाणे, सिमंत गजभिये, राकेश पाटील, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.