AmravatiLatest NewsLocal News
विद्यापीठात माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची पुण्यतिथी संपन्न

अमरावती – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांची पुण्यतिथी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन म्हणून संपन्न झाली. याप्रसंगी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले व उपस्थितांना दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन व माजी पंतप्रधान भारतरत्न राजीव गांधी यांच्याबद्दल जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी माहिती दिली.