अकोट तालुक्यात १६ र्षीय मुलीचा बालविवाह थांबवण्यात यश

अकोला : महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत सुरू असलेल्या चाईल्ड हेल्पलाईन – 1098, तसेच बाल विवाहमुक्त भारत अभियान आणि Access to Justice प्रकल्प अंतर्गत अकोट तालुक्यात एक बाल विवाह थांबवण्यात यश आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, दहीहंडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे २९ वर्षीय पुरुषाशी लग्न ठरवण्यात आले होते. याची माहिती मिळताच जिल्हा प्रकल्प समन्वयक शंकर वाघमारे यांनी तत्काळ याची कल्पना जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनील सरकटे यांना दिली.
लग्नाची तयारी सुरु असतानाच कारवाई
तत्काळ पावले उचलत बाल कल्याण समिती, ग्राम बाल संरक्षण समिती, Access to Justice प्रकल्प I.S.W.S. अकोला आणि एन्करेज एज्युकेशन फाउंडेशनच्या पथकाने लग्न स्थळी धाव घेतली.
त्यावेळी नवऱ्याच्या घरून जेवणाची पाटी निघाली होती. मुलीच्या घरी चौकशी केली असता, घरची अत्यंत हलाखीची परिस्थिती, चार बहिणी व एक भाऊ, आणि आर्थिक दुर्बलता यामुळे पालकांनी अल्पवयीन वयात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
समुपदेशन आणि कायद्याची माहिती देत बालविवाह थांबवला
पथकाने मुलीचे पालक, वऱ्हाडी आणि गावकऱ्यांची बैठक घेऊन बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 याची माहिती दिली.
📌 १८ वर्षांपूर्वी मुलीचे लग्न करणे कायद्याने गुन्हा आहे, हे स्पष्ट करून सर्वांचे समुपदेशन करण्यात आले.
➡️ नंतर मुलगी, मुलगा आणि संबंधित वऱ्हाडी मंडळी यांना बाल कल्याण समिती, अकोला येथे हजर करण्यात आले.
➡️ समितीने आई-वडिलांकडून तसेच नवरदेवाच्या पालकांकडून लेखी हमीपत्र घेतले की मुलीचे १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत लग्न लावण्यात येणार नाही.
संयुक्त प्रयत्नांमुळे बालिका वाचली
या कारवाईत पुढील अधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा मोलाचा सहभाग होता:
गिरीश पुसदकर (जिल्हा महिला व बालविकास अधिकारी)
राजू लाडुलकर (जिल्हा बाल संरक्षण अधिकारी)
अनिता गुरव व सदस्य मंडळी – बाल कल्याण समिती
शंकर वाघमारे, सुनील लाडुलकर, सपना गजभिये व ISWS टीम
महेंद्र गणोदे – एन्करेज फाउंडेशन
दहीहंडा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील
ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य
जाणीवजागृती आणि तत्परतेमुळे वाचली एका बालिकेची आयुष्य
ही घटना संवेदनशीलता, कायद्यानिष्ठा आणि सामाजिक भान या त्रिसूत्रीचा आदर्श ठरली आहे. अशा प्रकारच्या कारवायांमुळे बालविवाहमुक्त समाज निर्माण होण्यास निश्चितच मदत होईल.