राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कारांचे चांदुर बाजार येथे भव्य आयोजन

चांदूर बाजार : राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान, अमरावतीच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय राजीव गांधी कृषी रत्न पुरस्कार 2025 चा वितरण सोहळा 21 मे रोजी सायंकाळी 5 वाजता चांदूर बाजार येथील कृषीतीर्थ परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. स्व. नानासाहेब देशमुख व स्व. नंदूभाऊ बंड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा. वसुधाताई देशमुख (माजी राज्यमंत्री) होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून निवड समिती अध्यक्ष प्रकाश साबळे, डॉ. रविंद्र वाघमारे, सौ. पोर्णिमाताई सवाई, एकनाथराव बंड, विनोदभाऊ कोरडे, दिलीप काळे, भैयासाहेब निचळ, नरेश पाटील, अभय देशमुख, किशोर खवले, गोपाल भालेराव, रमण लंगोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात चांदूर बाजार तालुक्यातील तीन गुणवान व प्रयोगशील शेतकरी पुत्रांना कृषी क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मानित करण्यात आले. सन्मानित शेतकरी पुढीलप्रमाणे:
श्री. ऋषिकेश जुनघरे (बेलोरा)
श्री. किशोरराव पोहोकार (जसापुर)
डॉ. तुषार देशमुख (तळवेल, ब्राम्हणवाडा पाठक) – प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व प्रयोगशील शेतकरी
या कार्यक्रमास परिसरातील नागरिक, शेतकरी वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यभर सुरू असलेल्या कृषी रत्न पुरस्कार सप्ताहाचा हा भाग चांदूर बाजारसाठी अभिमानाचा क्षण ठरला.