अमरावती विद्यापीठ पतसंस्थेच्यावतीने उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कारप्राप्त कर्मचा-यांचा सत्कार

अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कार देवून सन्मानित केलेले कर्मचारी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर, सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक श्री. उमेश लांडगे, विकास विभागाच्या अधीक्षक सौ. उमा चांभारे, परीक्षा विभागातील वरिष्ठ लघुलेखक श्री. प्रवीण अलटकर, वित्त विभागातील वरिष्ठ सहायक सौ. प्रज्ञा बोंडे, प्रयोगशाळा परिचर श्री. गजानन देशमुख यांचा विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेच्यावतीने सत्कार करण्यात आला. पतसंस्थेचे अध्यक्ष श्री मंगेश वरखेडे यांचे हस्ते सर्व सत्कारमूर्तींचे पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
याप्रसंगी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, योग्य अधिकारी व कर्मचारी यांची उत्कृष्ट सेवा गौरव पुरस्कारासाठी निवड झाली. सर्व पुरस्कारप्राप्तकत्र्यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. विद्यापीठाला व पर्यायाने त्यांनी विद्यार्थी व अभ्यागतांना तत्पर सेवा देवून विद्यापीठाच्या नावलौकीकात भर घातली आहे.
अध्यक्ष श्री मंगेश वरखेडे म्हणाले, सत्कारमूर्तींना मिळालेला पुरस्कार सर्वोच्च असून त्यांनी सेवाकाळात केलेल्या कार्याची दखल कार्यालयाने घेतली. विद्यापीठाच्या या मानाच्या पुरस्कारासाठी नि:ष्पक्षपणे निवड केल्या जाते. सर्व सत्कारमूर्तींनी विद्यापीठासाठी केलेले कार्य संस्थेचा गौरव वाढविणारे आहे.
सर्व सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त करतांना पत संस्थेच्यावतीने कार्याची दखल घेवून सत्कार केल्याबद्दल सर्वच पदाधिका-यांप्रती आभार व्यक्त केले. पतसंस्थेचे मानद सचिव श्री श्रीकांत तायडे यांनी प्रास्ताविक व संचालन, तर पतसंस्थेचे संचालक श्री चंद्रशेखर लोखंडे यांनी आभार मानले. यावेळी पतसंस्थेचे खजिनदार श्री राजेश एडले, संचालक श्री. कैलास राठोड, श्री प्रवीण निर्मळ, सौ. प्रज्ञा बोंडे तसेच सौ. पुनम जाधव, सौ. राजश्री देसली आदी उपस्थित होते.