पथ्रोट येथे महा राजस्व समाधान शिबिर चा समारोप यशस्वीपणे पडला पार

अचलपूर : छत्रपती शिवाजी महाराज महा राजस्व समाधान अभियानाचा समारोप समारंभ अचलपूर उपविभागातील पथ्रोट येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात आमदार केवलराम काळे, उपविभागीय अधिकारी बळवंत रखराव, तहसीलदार डॉ. संजय गरकल, भाजपा ग्रामीण उपाध्यक्ष सुधीर असे, नितीन वाट यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
राज्य शासनाच्या लोककल्याणकारी योजनांना गती देण्यासाठी राबवण्यात आलेल्या 100 दिवसांच्या “महा राजस्व अभियान” अंतर्गत अचलपूर उपविभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या अभियानातून शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य नागरिकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले आहेत.
समारोप समारंभात बोलताना तहसीलदार डॉ. संजय गरकल यांनी सांगितले की, “राजस्व विभागाच्या विविध योजनांचा लाभ शेकडो नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आला असून, तक्रारींचे निवारण त्वरित करण्यात आले. 100 दिवसांत जनतेच्या समस्या मार्गी लावण्याचे आमचे उद्दिष्ट बऱ्याच प्रमाणात साध्य झाले.”
उपविभागीय अधिकारी बळवंत रखराव आणि आमदार केवलराम काळे यांनी अचलपूर उपविभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे विशेष कौतुक करत, त्यांच्या कार्यक्षमतेमुळे शासनाचे उपक्रम जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचल्याचे नमूद केले.
प्रतिनिधी – नितेश किल्लेदार