Accident NewsAmaravti GraminLatest News
वाठोडा-शुक्लेश्वर मार्गावर मिनी ट्रकची पोलीस व्हॅनला धडक

वाठोडा शुक्लेश्वर – वाकी मार्गावर २३ मे रोजी मध्यरात्री २ वाजता खोलापूर पोलीस स्टेशनच्या ११२ क्रमांकाच्या पोलीस व्हॅनला अज्ञात मिनी ट्रकने जोरदार धडक दिल्याची घटना समोर आली आहे. या धडकेत खोलापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुलभा राऊत किरकोळ जखमी झाल्या असून, त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले आहेत.
अपघातग्रस्त पोलीस व्हॅन गस्तीसाठी निघाली होती. दरम्यान, रेती वाहतुकीचे संशयित वाहन असलेल्या मिनी ट्रकने समोरून येत जोरदार धडक दिली. यामुळे वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.