AkolaLatest News
शिवरमध्ये जागतिक शून्य सावली दिन संत विचारधनाने साजरा

शिवर : श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यांच्या वतीने आज जागतिक शून्य सावली दिन साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी संतांच्या विचारधनाचा प्रसार करत भक्तगणांनी समाजप्रबोधनाचा अनोखा उपक्रम राबवला.
सकाळीच वारकरी भक्तांनी पारंपरिक वेशात टाळ मृदंगाच्या गजरात संतविचारांची मिरवणूक काढली. “माणसं सावलीसारखी साथ सोडतात, पण संतविचार सदैव आपल्या सोबत राहतात” – हा मुख्य संदेश देत अनेक युवकांनी सहभागी होऊन उपस्थितांची मनं जिंकली.
कार्यक्रमात प्रवचन, भजन, कीर्तन, आणि सामूहिक नामस्मरण अशा विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “या दिवशी सावली हरवते, पण विचार जर उजळ असेल तर माणूस कधीच एकटा राहत नाही.”