संस्थाध्यक्ष श्री योगेंद्र गोडे यांच्या वाढ दिवसा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अमरावती : राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ९ अमरावती येथील पोलीस अधिकारी, पोलीस अमलदार तसेच वर्ग ४ कर्मचारी गडचिरोली नक्षल बंदोबस्त, आणी-बाणी च्या वेळी राज्या बाहेरील बंदोबस्त, तसेच कायदा व सुव्यवस्था बंदोबस्त करीता सतत कर्तव्य पार पाडण्याकरीता बाहेर राहत असतात. पोलीस कर्मचारी यांच्या सततच्या व्यस्त जिवन शैलीमुळे स्वतः तसेच आपल्या कुंटुंबातील सदस्य यांच्या स्वास्थ संबंधीत समस्या उद्भवत आहे.
त्यानुषंगाने समाजातील महत्वाचा घटक समजला जाणारा पोलीस व आरोग्य विभाग यांच्यातील स्नेहपुर्वी संबंध जपण्यास मदत होवुन समाजापुढे पोलीस व आरोग्य विभाग आदर्श घटक समजला जावा या उद्देशाने डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तर्फे गटातील पोलीस अधिकारी , पोलीस अमलदार व त्यांच्या कुंटुंबियाकरीता दिनांक १९.०५.२०२५ ते २३.०५.२०२५ (सोमवार ते शुक्रवार) या कालावधीत सर्व प्रकारच्या आजारावर मोफत वैद्यकीय, पॅथॉलॉजी, शस्त्रक्रिया तसेच औषर्थोपचार करण्यात आले.
या जवानांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल तर्फे एक विशेष वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला होता.
इंदिरा बहुउद्देश्यीय संस्थेचे अध्यक्ष श्री योगेंद्र गोडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित या शिबिराचे उद्घाटन राज्य राखीव पोलिस दलाचे सह-कमाण्डेन्ट श्री सुरेश कराळे , CO श्री सुशांत सिंह , डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल चे डायरेक्टर डॉ. सुनील हातकर , डॉ. सचिन हीरे , प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीरज मुरके , PI श्री ठाकरे , PI श्री अजय कालसरपे, इत्यादी मान्यवारांद्वारे द्वीपप्रज्वलन करून करण्यात आले . या प्रसंगी आरोगयाचे दैवत धनवंतरी तसेच डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल चे संस्थापक अध्यक्ष स्व. डॉ. राजेंद्र गोडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.नीरज मुरके यांनी डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथील उपलब्ध सुविधा बद्दल माहिती दिली तसेच संस्थेच्या संचालक मंडला तर्फे देशाच्या सुरक्षिततेसाठी सतत काम करणाऱ्या राज्य राखीव पोलिस , सेना , पोलिस व त्यांच्या कुटुंबियांना डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे २४ तास आरोग्य सेवा देण्याची ग्वाही दिली. सह-कमाण्डेन्ट श्री सुरेश कराळे यांनी डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे उपलब्ध सुविधांचे कौतुक केले व राज्य राखीव पोलिस व त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित या आरोग्य शिबिरासाठी डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल च्या संचालक मंडळाचे , सर्व डॉक्टर्स व स्टाफ चे आभार मानले.
भारत – पाकिस्तान युद्धाच्या उम्बरठ्यावार आयोजित या शिबिराने सीमेवरती ड्यूटी करणाऱ्या प्रत्येक शिपायाला समाधान होत असल्याचे व त्यांचे मनोबल वाढन्याचे त्यांनी सांगितले. डॉ. सुनील हातकर यांनी भारतीय सेना , पोलिस , राज्य राखीव पोलिस दल व परिवार यांच्या आरोग्यासाठी आम्ही कटीबद्ध आहो तसेच यांच्या साठी फूल न फूलाची पाखळी आम्ही अश्या शिबिराने करण्याचा समाधान मिळण्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरात तज्ञ डॉक्टरांच्या टीम द्वारे जवानांची तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांची सर्वसामान्य आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, दंत तपासणी, रक्तदाब, मधुमेह तपासणी , कान , नाक , घसा तपासणी , स्त्रीरोग व बालरोग तपासणी , अस्थिरोग तपासणी , गरजुंची ई. सी.जी , 2-डी ईको , एंजियोग्राफी , एंजियोप्लास्टी इत्यादी सेवा पुरविण्यात आली. आवश्यकतेनुसार औषधे देखील वितरित केली गेली. शस्त्रक्रिया ची गरज पडल्यास गरजुंवर मोफत शस्त्रक्रिया देखील करण्यात आली.
या उपक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे आपले देशरक्षक असलेल्या जवानांचे तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांचे आरोग्य टिकवून ठेवणे आणि वेळोवेळी आवश्यक वैद्यकीय सल्ला व उपचार उपलब्ध करून देणे होते.
डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल ने या उपक्रमासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवकांचे आभार मानले आहेत.
SRPF चे कमाण्डेन्ट श्री राकेश कलासागर यांच्या संकल्पनेने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सी.ओ श्री सुशांत सिंह , सह-कमाण्डेन्ट श्री सुरेश कराळे , PI श्री अजय कालसरपे , PI श्री ठाकरे , PI श्री येसनकर , PI श्री सानप , PI श्री चौधरी , PI श्री तिखाड़े यांनी देखील या शिबिरात स्वतः ची तपासणी करून घेतली व समाधान दर्शविला.
SRPF च्या यूनिट हॉस्पिटल स्टाफ पैकी वैद्यकीय अधिकारी डॉ. रविन्द्र डोंगरे , सौ. प्रियंका ढाकने , श्री तुषार पूरी , श्री सागर सपाटे , श्री गणेश गेडाम , श्री प्रफुल साठे , कु. नीता वाघ , कु. हार्दिका तरहेकर यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले.
५ दिवसांसाठी आयोजित या आरोग्य शिबिरात राज्य राखीव पोलिस बल व त्यांच्या कुटुंबियांचे सुमारे ८०० सदस्यांची सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली.रक्त , लघवी तपासणी , औडिओमेट्री , ईको , एंजियोग्राफी , एंजियोप्लास्टी , डायलिसिस , सर्व शस्त्रक्रिया इत्यादि मोफत करण्यात आली.भर्ती झालेल्या रुग्नाना मोफत औषधोपचार देण्यात आले .
इंदिरा बहुउद्देश्यीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री योगेंद्र गोडे , सचीव मिस तन्वी गोडे , प्रधान संचालक डॉ. दिलीप गोडे , CEO डॉ. योगेश गोडे यांनी भविष्यात देखील असेच आरोग्य शिबीर चे आयोजन करून गरजू रुग्णाना सर्वोत्तम आरोग्य सेवा देण्याचे निर्धार केले आहे.
या आरोग्य शिबिराच्या यशस्वितेसाठी श्री वैभव कोकाटे, श्री स्वनिल वेरुळकर , श्री चंद्रकांत काळे , श्री अक्षय कावरे , श्री निखिल तायड़े , श्री राजकुमार गाले , कु. लाखी बिस्वास , कु. आरती शेलोकर , कु. प्रतीक्षा ठवरे , श्री भूषण भेंडे , कु. दीपाली खताडे , कु. जानवी देशमुख , श्री नितेश फुटाणे , कु. पल्लवी लोखंडे , कु. पायल वानखड़े यांनी अथक परिश्रम घेतले.
डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल परिवारातर्फे राज्य राखीव पोलिस बल , भारतीय सेना , पोलिस यांचे कोटी कोटी आभार.