7 पोलीस निलंबित, अवैद्य धंद्यांशी संगनमत?

अमरावती : अवैद्य धंदे चालवणाऱ्या व्यावसायिकांसोबत हातमिळवणी केल्याच्या गंभीर आरोपांमुळे अमरावती ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी मोठी कारवाई करत जिल्ह्यातील 7 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी 16 एप्रिलपासून सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलीस विभागात शिस्त आणि सुसूत्रता आणण्याचा धडाका सुरू केला आहे. याअंतर्गत सर्व पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची चौकशी करण्यात येत आहे.
निलंबित पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आणि ठाणे:
- रवी अखंडे – पोलीस मुख्यालय, अमरावती
- अलीम गवली – चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन
- शरद आडे – दर्यापूर पोलीस स्टेशन
- निखिल खंडार – परतवाडा पोलीस स्टेशन
- अमोल कथलकर – अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन
- प्रशांत अहिर – येवदा पोलीस स्टेशन
- एक महिला लिपिक – कार्यालयीन अनियमिततेमुळे निलंबन
या कर्मचाऱ्यांवर अवैद्य धंद्यांना पाठीशी घालणे, त्यांच्यावर कारवाई न करणे, तसेच कामात गंभीर हयगय केल्याचे आरोप सिद्ध झाले आहेत.
पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांची प्रतिक्रिया:
“पोलीस दल हे जनतेचा विश्वास असलेली संस्था आहे. अशा विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून कडक पावले उचलली जात आहेत. कामात हलगर्जीपणा किंवा गुन्हेगारांना पाठबळ देणाऱ्यांसाठी पोलीस विभागात जागा नाही.”
ही कारवाई भविष्यातील अधिक कठोर पावलं उचलण्याचा संकेत मानली जात आहे. जिल्ह्यातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्येही यामुळे धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.