घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ पडसा येथे संपन्न

श्री क्षेत्र माहूर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या सूचनेनुसार विविध योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना प्रत्येकी 5 ब्रास मोफत वाळू देण्याचा शुभारंभ दि. 24 मे रोजी पडसा येथे तहसीलदार किशोर यादव यांचे हस्ते झाला. शासनाच्या या उपक्रमाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,आ.भिमराव केराम,सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथचंद्र दोन्थुला,तहसिलदार किशोर यादव यांचे घरकुल लाभार्थ्यांनी आभार मानले.
महाराष्ट्रातील संपूर्ण घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध होईल तिथून 5 ब्रास मोफत वाळू देण्याचा निर्णय शासनाने 8 एप्रिल व 30 एप्रिल रोजी जाहीर केला.त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले व सहाय्यक जिल्हाधिकारी झेनीथ चंद्र दोन्थुला यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव, नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड, कैलास जेठे यांनी सर्व मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना सोबत घेऊन वाळू स्त्रोतांची पाहणी केली, आणि दि.24 मे रोजी पडसा येथून मोफत वाळू वाटप योजनेचा शुभारंभ केला.यावेळी आ. भीमराव केराम यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे लाभार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तहसीलदार किशोर यादव, नायब तहसीलदार डॉ. राजकुमार राठोड,कैलाश जेठे,सरपंच रुखमाबाई आरके, भाजपा तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, अनिल वाघमारे, नगरसेवक गोपू महामुने,उपसरपंच बाबाराव चौधरी, विलास पाटील चौधरी, प्रकाश गायकवाड, किसनराव मारबते,नंदकुमार जोशी, हर्षदीप दीक्षित,कुलदीप घोडेकर, आनंदा हिंगाडे, निलेश तायडे,अविनाश भोयर, विनायक मुसळे, शेख इमरान,शंकर भालेराव ,गोपाल चव्हाण,शेख मोईज,विजय आमले,लाभार्थी बंडू शेवाळे, शेंडे, शुभम भवरे यांचे सह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.तालुक्यातील संपूर्ण घरकुल लाभार्थ्यांना सोमवार पासून 5 ब्रास मोफत वाळू देण्यात येईल अशी माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी दिली.