नागपुरात गांजासह दोघांना अटक, लकडगंज पोलिसांची मोठी कारवाई

२३ मे च्या रात्रीसव्वा आठच्या सुमारास, लकडगंज पोलीस ठाण्याच्या पथकाने एक गोपनीय माहितीच्या आधारे नागपूरमधील गंगा जमुना वस्ती, मॉ अंबे किराणा अॅण्ड जनरल स्टोअर्स समोर सापळा रचला.
पोलिसांना मोहम्मद शरीक मोहम्मद सादीक, वय १९ वर्ष आणि सोहेल प्यारे शेख, वय २३ वर्ष हे दोन संशयित इसम आढळून आले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता, त्यांच्या ताब्यातून १ किलो ९६ ग्रॅम गांजा, तीन मोबाईल, अॅक्टीव्हा आणि स्प्लेंडर दुचाकी असा एकूण २ लाख १ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तपासादरम्यान उघड झालं की, हे दोन्ही आरोपी नयन ढोके नावाच्या फरार आरोपीच्या मदतीने गांजाची विक्री करीत होते. आरोपींच्या या गंभीर कृत्यावर एन.डी.पी.एस. अॅक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध सुरु आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त महेक स्वामी, सहा. पोलीस आयुक्त श्वेता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजर शेख, यांच्या टीमच्या सहकार्याने पार पडली.