AmravatiLatest NewsLocal News
नालीसफाईची कामे वेळेत पूर्ण करा – उपायुक्त डॉ. मेघना वासनकर

शुक्रवार दि.२३/०५/२०२५ रोजी उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी राजकमल चौक येथील ऑटोगल्ली जवळील नालीची पाहणी केली असून सदर नाली त्वरीत साफ करण्याचे निर्देश स्वास्थ निरीक्षकांना दिले होते. मनपा उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांच्या निर्देशानुसार आज दि.२४/०५/२०२५ रोजी जेसीपीद्वारे राजकमल चौक येथील ऑटोगल्ली जवळील नालीची साफ करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
सदर नालीमधून गाळ काढण्याची कामे ठरवलेल्या वेळेत पूर्ण करावीत, आवश्यक तेथे अतिरिक्त मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री नेमून कामांना गती द्यावी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे कामांची पारदर्शकता आणि गुणवत्ता तपासावी, असे निर्देश महापालिका उपायुक्त डॉ. मेघना वासनकर यांनी यंत्रणेला दिले आहेत.