महाराष्ट्राला धडकी भरवणारी बातमी! ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू

Corona Update: 2020मध्ये चीनमधून आलेल्या कोरोनाने जगभरात थैमान घातले होते. संपूर्ण जगात लॉकडाऊन लागला होता. आता पुन्हा एकदा याच कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. जगभरात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्तेय वाढ झालीय.. सिंगापूर आणि हॉंगकॉंग या दोन्ही ठिकाणी 14 हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. अशातच महाराष्ट्रात धडकी भरवणारी बातमी समोर आली आहे. ठाण्यात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ठाण्यातील कळवा रुग्णालयात 21 वर्षीय तरुणाचा कोरोना प्रादुर्भावाने मृत्यू झाला आहे. मुंब्रा येथे राहणाऱ्या या 21 वर्षीय तरुणाचा सकाळी सहाच्या सुमारास मृत्यू झाला आहे.
22 मे 2025 रोजी साठी उपचारासाठी त्याला कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वैद्यकीय तपासात समोर आले आहे. 23 मे 2025 रोजी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला. यानंतर 24 मे 2025 रोजी त्याचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळेच त्याचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मुंबईत कोरोनामुळे शुक्रवारी एकाचा मृत्यू झाला. 24 तासांत कोरोनाचे 35 नवे रुग्ण आढळून आले आहेत. याआधीही केईएममधील दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे . महिनाभरात राज्यात कोरोनाचे 177 रुग्ण आढळले आहेत.
जगभरात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्तेय वाढ झालीय.. सिंगापूर आणि हॉंगकॉंग या दोन्ही ठिकाणी 14 हजारांपेक्षा जास्त कोरोनाचे रुग्ण आहेत. काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.
परदेशातून पर्यटक आल्यास भारतातही कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. क्कॉरंटाईन होण्याची लोकांची मानसिकता नाही. त्यामुळे इतर नवीन पर्यास शोधण्याची गरज असल्याचं यावेळी दीपक सावंत यांनी म्हटलंय.. तसेच उच्चस्तरीय बैठक घेऊन प्लॅन तयार करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलंय. तस पत्रच त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लिहिल आहे.
कोरोना पुन्हा एकदा सक्रीय होत असल्याची चिन्हं दिसताच मुंबई महानर पालिका अलर्ट झाली आहे. मुंबईत कोरोना रुग्णासाठी विशेष खाटा आणि कक्षाची व्यवस्था करण्यात आलीये.. सेव्हन हिल्स आणि कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांसाठी विशेष खाटा आणि कक्षांची निर्मिती करण्यात आलीये. तसंच बीएमसीच्या सर्व रुग्णालयांमध्ये कोरोनावर उपचार आणि मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली.