LIVE STREAM

Latest NewsMaharashtra PoliticsNagpur

शेतकऱ्यांसाठी पांधण रस्ते अनिवार्य पालकमंत्र्यांनी दिली माहिती

राज्यातील शेतकऱ्यांसाठी पिकांप्रमाणेच आवश्यक असलेल्या पांधण रस्त्यांवरील अतिक्रमण, रिकॉर्डवरील नसलेले रस्ते, तसेच नुकसानभरपाई व स्थानिक निवडणुका या सर्व विषयांवर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाम भूमिका मांडली.

पांधण रस्त्यांचा मुद्दा गंभीर

बावनकुळे म्हणाले, “शेतकऱ्यांसाठी पांधण रस्ते अत्यावश्यक आहेत. अनेक ठिकाणी हे रस्ते अतिक्रमणात गेलेत किंवा रेकॉर्डवरच नाहीत. या संदर्भात नियोजित बैठक घेण्यात आली असून, आवश्यक निर्णय शासनाने घेतले आहेत.”

अवकाळी पावसाच्या नुकसानीवर मदतीचं आश्वासन

राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीवर बोलताना बावनकुळे म्हणाले, “प्रशासनाने पंचनामे सुरू केले असून, सर्व जिल्ह्यांना मदत व पुनर्वसनासाठी निधी मिळणार आहे.”

स्थानिक स्वराज्य निवडणुका महायुतीतूनच

प्रफुल्ल पटेल यांनी काय वक्तव्य केलं हे माहित नाही, मात्र बावनकुळे म्हणाले, “निवडणुकीविषयी बैठक होणार असून, सर्वांनी महायुतीतूनच निवडणुका लढायच्या आहेत. २८८ आमदार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे मेहनत घेतली आहे.”

राजकीय टीका नाही, आज जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा काळ

बावनकुळे यांनी स्पष्ट केलं की, “कोणाने काम केलं किंवा नाही, हे बोलण्याचे दिवस नाहीत. आज जनता आपल्या सरकारकडून अपेक्षा ठेवते, म्हणून टीका करण्याऐवजी काम करून दाखवण्याची गरज आहे.”

“लाडकी बहिण” योजना आणि अफवांवर स्पष्टीकरण

“लाडकी बहिण योजनेचं बजेट स्वतंत्र आहे आणि आदिवासी योजनेचं बजेट स्वतंत्र आहे. त्यामुळे एक योजनेचं बजेट दुसरीकडे वळवलं गेलं, हे अफवांवर आधारित खोटे आरोप आहेत,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

राहुल गांधींवर बोचरी टीका

राहुल गांधींवर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले, “राहुल गांधींना काही समजत नाही. ते अभ्यास करत नाहीत आणि शिकण्याची सवयही नाही. परदेशात दोन-दोन महिने राहून परराष्ट्र धोरणावर टीका करतात. दहशतवादाविरोधात लढाई मोदींनी कशी लढावी, हे शिकवायची गरज नाही.”

मतदान वेळी मोबाईल वापरावर सूचना

निवडणूक आयोगाशी सल्लामसलत करून निर्णय घेण्यात आला आहे की, “मतदान केंद्रात मोबाईल नेणं शक्य असलं, तरी मतदान करताना मोबाईल पूर्णतः वर्ज्य असावा. मात्र मतदान केंद्रात मोबाईलच नेऊ देणार नाही, अशी सक्ती अयोग्य आहे,” असं बावनकुळे म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!