LIVE STREAM

AkolaLatest News

अकोला : धुवांधार पावसात डाबकी रोडवर खोदकाम ठप्प!

अकोला : अकोला शहरात वादळी वाऱ्यासह धुवांधार पावसाचा जोरदार तडाखा बसला. या पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले असून डाबकी रोडवरील अपूर्ण रस्ता रुंदीकरणाचे काम नागरिकांच्या डोकेदुखीचे कारण ठरत आहे.

महापालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी डाबकी रोडवर तब्बल दीड किलोमीटरपर्यंत दोन फूट खोल खोदकाम मागील एका महिन्यापासून सुरू ठेवले आहे. मात्र, काम रखडल्याने त्या ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. आजच्या पावसामुळे खोदलेल्या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी भरले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावं लागत आहे.

यामुळे लहानसहान अपघातांच्या घटनाही समोर येत असून स्थानिक नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हे खोदकाम त्वरित पूर्ण करून रस्ता डागडुजी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

रुंदीकरणाचं काम सुरू असलेल्या डाबकी रोडवर त्वरित मुरूम टाकून रस्ता समतल करण्यात यावा, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

प्रतिनिधी – मुकेश ढोके

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!