अमरावतीचे नवे पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांचे भव्य स्वागत

अमरावती : अमरावती शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून अरविंद चावरिया यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या स्वागतार्थ कालीमाता मंदिराचे पीठाधीश्वर श्री शक्ति महाराज, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी नानकराम नेभनानी आणि शहरातील विविध मान्यवर नागरिकांनी पुढाकार घेत चावरिया यांचे उत्साहात स्वागत केले.
या स्वागत समारंभात पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांना शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देत अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्थेच्या बळकटीसाठी सहकार्याची ग्वाही दिली.
तसेच, पोलीस उपायुक्त सागर पाटील आणि पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांचेही शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्याला पोलीस प्रशासनातील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन पोलीस आयुक्त अरविंद चावरिया हे यापूर्वीही विविध ठिकाणी आपल्या कार्यक्षमतेसाठी ओळखले गेले असून, अमरावतीच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचा कार्यकाळ महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.