LIVE STREAM

BollywoodLatest News

‘कसली XX दिसतेस, फ्लर्ट करण्याची इच्छा झालीय’; मराठी अभिनेत्याचा प्राची पिसाटला अश्लिल मॅसेज

झी मराठी वाहिनीवरील ‘तू चालं पुढे’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडली. या मालिकेतील कलाकारही प्रेक्षकांच्या लक्षात राहिले. यामध्ये ताराची भूमिका प्राची पिसाटने साकारली आहे. प्राची सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती सोशल मीडियावर अनेक अपडेट्स शेअर करत असते. यावेळी तिने ज्येष्ठ अभिनेते सुदेश म्हशीलकर यांच्या फेसबुक मेसेजच्या स्क्रीन शॉट शेअर केला आहे. या स्क्रिन शॉटसह प्राचीने आरोप देखील केले आहेत.

काय आहे अश्लील मॅसेज

सुदेश म्हशीलकर हे मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते आहेत. यांनी देखील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेत काम केलं आहे. प्राची पिसाटने सुदेश यांच्या फेसबुक मेसेजचा स्क्रीन शॉट सोशल मीडियावर शेअर केला आहे. ‘तुझा नंबर पाठव ना…तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये…कसली गोड दिसतेस’ असा मेसेज सुदेश यांनी प्राचीला केला आहे.

प्राचीने असं दिलं उत्तर
प्राचीने हा स्क्रीन शॉट शेअर करत, ‘आणि मला हा स्क्रिनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली.बायकोचा नंबर असलेच…ती ही गोड आहे…बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का…ही पोस्ट डिलीट कर सांगायला कुठून तरीनंबर मिळवशील आणि कॉल करशीलच’ असं लिहिलं आहे.

अकाऊंट हॅक झाल्याची चर्चा
सुदेश यांच्यावर त्यांच्या चाहत्यांनी विश्वास दाखवला आहे आणि त्यांचं अकाउंट हॅक झालं असल्याच्या चर्चा आहेत. एका नेटकऱ्याने प्राचीच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलं की, ‘काही लोकं यांना खूप वर्षांपासून ओळखतात आणि एवढी १००% खात्री ही आहे की हे नसतील, तू पोलिसात तक्रार दाखल कर, ते सांगतील हॅकर होता की ते स्वतः आहेत’ यावर प्राचीने रिप्लाय केलाय की, ‘मला कोणाला त्रास नाही द्यायचा…मला फक्त दोनदा शांतपणे इग्नोर केल्यानंतर एका मॅच्युअर माणसाला कळलं नाही म्हणून माझ्या पद्धतीने मेसेज येणं बंद करायचं होतं’.

मराठी सिनेेसृष्टीत असा प्रकार घडल्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. अनेक कलाकारांनी हे अकाऊंट सुदेश यांचं नसल्याच म्हटलं आहे. पण अद्याप सुदेश म्हशीलकर यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे हा प्रकार नक्की काय आहे याबद्दल सांगता येणे कठीण आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!