LIVE STREAM

Latest NewsMaharashtra PoliticsNanded

काँग्रेसला मोठा झटका! जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांचा राजीनामा; उद्या अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

नांदेड : नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून उद्या ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत.

बी. आर. कदम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांचे निकटवर्तीय समजले जात होते. काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कदम यांचा सत्कार केला होता. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच कदम यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.

यामुळे नांदेड जिल्हा काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या गळतीला आणखी गती मिळाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, नांदेड आणि परभणी जिल्ह्यातील काँग्रेसचे दोन माजी आमदार देखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजकीय वर्तुळात बी. आर. कदम यांच्या भाजप प्रवेशामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अडचणी वाढू शकतात, अशी चर्चा आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!