LIVE STREAM

Latest Newsmelghat

चिखलदरा : ५०० फूट खोल दरीत पडण्यापासून कार थोडक्यात बचावली

चिखलदरा : रविवारी संध्याकाळी चिखलदऱ्यातील किला रोडवरील प्रसिद्ध सेल्फी पॉइंटवर एक मोठा अपघात टळला. ५०० फूट खोल दरीच्या कड्यावरून कोसळण्याच्या क्षणीच एक क्रेटा कार अडकल्याने चार तरुणांचा जीव वाचला.

ही घटना रविवारी संध्याकाळी ६ वाजता घडली. कार (MH 29 BS 7009) मधील चार तरुण चिखलदऱ्याच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आले होते. त्यांनी गाडी सेल्फी पॉइंटजवळ पार्क केली होती. मात्र पावसामुळे गवत आणि माती ओली झाल्याने कारचा तोल गेला आणि ती थेट दरीकडे सरकू लागली.

क्षणात कारचा काही भाग हवेत लटकला आणि मोठा अपघात होण्याची भीती निर्माण झाली. सुदैवाने घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन मदत केली आणि कारमधील चारही तरुणांना सुखरूप बाहेर काढले.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, पावसामुळे किल्ल्यावर जाणारा मुख्य रस्ता बंद असल्याने पर्यायी मार्गावर ही घटना घडली. प्रशासनाने आता या भागातील सुरक्षा उपाययोजनांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!