आज सोनं स्वस्त झालं की महाग? वाचा आजचा 10 ग्रॅमचा भाव

Gold Rate Today: सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चढ-उतार होताना दिसत आहे. काल सोन्याचे दर थोडेसे स्वस्त झाले होते. पण आज मात्र पुन्हा एकदा सोन्याचे दर महागले आहेत. तर एकीकडे चांदीच्या दरातही हलकी वाढ झाली आहे. चांदी 75 अंकानी वाढून 97928 रुपयांवर पोहोचलं आहे. हिच परिस्थिती आंतरराष्ट्रीय बाजारातदेखील पाहायला मिळाली आहे.
सोनं आंतरराष्ट्रीय स्तरावर 3375 डॉलर आणि चांदी 33 डॉलरने कोसळले आहे. तर, देशांतर्गंत बाजारात सोनं आज पुन्हा एकदा वधारलं आहे. आज 22 कॅरेट सोन्याचे दर 490 रुपयांनी वधारले आहेत. तर, 24 कॅरेट सोन्याचे दर 450 रुपयांनी वाढले आहेत. 18 कॅरेट सोन्याचे दर 450 रुपयांनी वधारले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसून येत आहे. त्यामागचे कारण म्हणजे अमेरिकेचे टॅरिफ दर. काही दिवसांपूर्वी सोन्याचे दर 1 लाखांपारदेखील गेले होते. मात्र आता सोन्याचे दर पुन्हा घसरले आहेत.
आज काय आहेत सोन्याचे भाव?
ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 89,950 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 98,130 रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 73,600 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 9,813रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 8,995 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 7,360 रुपये
ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 78,504 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 71,960 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 58,880रुपये
मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
22 कॅरेट- 89,950 रुपये
24 कॅरेट- 98,130 रुपये
18 कॅरेट-73,600 रुपये