डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
अमरावती : अमरावतीतील डॉ. राजेंद्र गोडे मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल च्या निसर्गरम्य परिसरात इंदिरा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री योगेंद्र गोडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या पर्यावरणपूरक उपक्रमात प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी वर्गाने उत्साहाने सहभाग घेतला.
उत्साही सुरुवात, जबाबदारीची जाणीव
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या कार्यक्षम सचिव मिस तन्वी गोडे यांच्या हस्ते रोप लावून झाली. यानंतर अधिष्ठाता डॉ. सुधा जैन, फार्मसी इन्स्टिट्यूटचे प्राचार्य प्रो. बुरकले, आणि प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीरज मुरके यांच्या हस्तेही वृक्षारोपण झाले. औषधी, फुलझाडे आणि फळझाडे अशा २०० पेक्षा अधिक झाडांची लागवड यावेळी करण्यात आली.
पर्यावरण शिक्षणाची नवी दिशा
मिस तन्वी गोडे म्हणाल्या, “झाडे लावणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण व्हावे यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा आहे.” अधिष्ठाता डॉ. सुधा जैन यांनी निसर्ग आणि आरोग्य यातील अतूट संबंधावर प्रकाश टाकला.
बाळाच्या नावाने झाडे लावण्याची अभिनव संकल्पना
कॉलेजमध्ये जन्म घेणाऱ्या नवजात बाळांच्या नावे एक झाड लावण्याची स्तुत्य परंपरा सुरू करण्यात आली आहे. ही संकल्पना मिस तन्वी गोडे यांची असून, तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विक्रम संकल्प – ११११ झाडांची लागवड
या उपक्रमाचा विस्तार करताना अमरावती, बुलढाणा आणि मलकापूर येथील शाळा व महाविद्यालयांमध्ये एकाच दिवशी एकूण ११११ झाडे लावण्याचा संकल्प प्रभारी अधीक्षक डॉ. नीरज मुरके यांनी जाहीर केला.
कार्यक्रमात सहभागी मान्यवर व कार्यकर्ते
या उपक्रमात श्री नितीन जेऊघाले, श्री विशाल व्यवहारे, श्री विजय भुसारी, श्री मोहित भंदन, श्री संजय घोगडे, श्री गणेश इंगळे, श्री सुभाष बेलोरकर, श्री वैभव कोकाटे, श्री भूषण भेंडे, श्री राजकुमार गाले यांच्यासह कु. लाखी बिस्वास, कु. आरती शेलोकार, श्री हर्षद बानेकर, कु. दीपाली खताडे, श्री अक्षय भोयर, कु. श्रुतिका राऊत, कु. दिव्या राऊत, श्री क्षितिज चांदुरे यांचे मोलाचे योगदान राहिले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी झाडांची देखभाल करण्याची शपथ घेतली आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.
प्रतिनिधी – नितेश किल्लेदार