श्रीमती दुर्गा देवीजी राठी स्मृती प्रीतीअर्थ जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धा 1 जूनपासून सुरू

अमरावती : अमरावती जिल्हा टेबल टेनिस संघटनेच्या वतीने, श्रीमती दुर्गा देवीजी राठी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जिल्हा मानांकित टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन येत्या 1 जूनपासून करण्यात आले आहे.
ही स्पर्धा पुणे येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी अमरावती जिल्हा संघाची निवड करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. राज्य संघटनेच्या निर्देशानुसार जिल्हा पातळीवर तीन ते चार मानांकित स्पर्धा घेऊन अंतिम संघ निवडला जाणार आहे.
या विशेष स्पर्धेचे आयोजन जगप्रसिद्ध श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे प्रधान सचिव पद्मश्री माननीय प्रभाकरराव वैद्य यांच्या आशीर्वादाने आणि जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष मान. प्रदीप भाऊ काळेले, शरद भाऊ कासट व बकुलजी कक्कड यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
स्पर्धेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ही स्पर्धा अमरावतीचे प्रसिद्ध उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते मान. विनोदजी राठी यांच्या सौजन्याने त्यांच्या मातोश्रींना अर्पण करण्यात आली आहे. विनोदभाई राठी यांनी खेळ, क्रीडा क्षेत्रासाठी नेहमीच भरीव योगदान दिले असून, बक्षिसे देऊन खेळाडूंना प्रोत्साहन दिले आहे.
स्पर्धेचे गट:
ही मानांकित स्पर्धा खालील सहा वयोगटांमध्ये पार पडणार आहे:
11 वर्ष वयोगट
13 वर्ष वयोगट
15 वर्ष वयोगट
17 वर्ष वयोगट
19 वर्ष वयोगट
खुला गट
पंच मंडळ:
प्रमुख पंच: श्री शहजाद खान
सहप्रमुख पंच: श्री राजू अँथनी फ्रान्सिस
जिल्हा संघ निवड प्रक्रिया:
या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे, प्रत्येक गटातील टॉप 5 खेळाडूंना निवडण्यात येणार आहे, जे राज्य अजिंक्यपद स्पर्धेत अमरावती जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
सहभागी पात्रता:
या स्पर्धेमध्ये शालेय, महाविद्यालयीन, पॉलिटेक्निक, कृषी विद्यापीठ व वैद्यकीय विद्यापीठातील तसेच इतर स्वतंत्र खेळाडूंनाही भाग घेण्याची संधी आहे.