अकोला शहरात 140.7 मिमी पावसाची नोंद तर जिल्यात 48.2 मिमी पावसाची नोंद, अकोला शहरात झाली काल रात्री अतिवृष्टी
अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसला, काल झालेल्या पावसामुळे शेती पिकांसह फळबागांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, हवामान खात्यातर्फे अकोला शहरात १४०.७ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून अकोला शहरात काल अतिवृष्टी झाल्याचे सांगण्यात आले आहे, याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्यात जसे अकोट तालुक्यात 58.9 मिमी, तेल्हारा तालुक्यात 39.9 मिमी, बाळापूर तालुक्यात 56.7 मिमी, पातूर तालुक्यात 55.6मिमी, अकोला तालुक्यात 49.9मिमी, बार्शीटाकळी तालुक्यात 31.1 मिमी तर मूर्तिजापूर तालुक्यात 41.7मिमी नोंद करण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यात काल रात्री 48.2 मिलिमीटर पाऊस पडण्याची माहिती नैसर्गिक आपत्ती विभागात दिली आहे.
काल झालेल्या पावसामुळे अकोल्या जिल्ह्यातील 1132 हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अकोला तालुक्यातील 34 गावात 286 हेक्टर पीक, बार्शीटाकळी तालुक्यातील 9 गावातील 35 हेक्टर, बाळापूर तालुक्यातील 37 गावात 250 हेक्टर तर सर्वाधिक पातूर तालुक्यातील 27 गावात 561 हेक्टर पिकाचे नुकसान झाले आहे, यामध्ये कांदा, भुईमुंग, ज्वारी, निंबु, केळी, मका तसेच तीळ पीक समाविष्ट असून आणखीन काही तालुक्यात शेती नुकसान संदर्भात सर्वेक्षण चे काम सुरू आहे.