LIVE STREAM

AkolaLatest News

अकोल्यात वादळाचा तडाखा! स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पिंपळाचे झाड चारचाकी वाहनावर कोसळले

अकोला : अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाने धडक दिली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याच पावसामुळे आज सायंकाळच्या सुमारास शहरातील मोहता मिल स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गावर एक मोठी दुर्घटना घडली. या मार्गावरून जाणाऱ्या एका चारचाकी वाहनावर अचानक मोठे पिंपळाचे झाड कोसळले.

या वाहनात दोन महिला, दोन लहान मुले आणि चालक असा एकूण पाच जण प्रवास करीत होते. झाड कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले असले तरी, सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे.

आमदार साजिद खान पठाण यांनी दाखवली तत्परता

घटनेची माहिती मिळताच अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आणि उपस्थित स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत वाहनातील सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. आमदार पठाण यांनी आपत्कालीन यंत्रणांना तत्काळ सूचना देऊन मदतकार्य सुरू केल्याचेही पाहायला मिळाले.

वाहतूक ठप्प, प्रशासन अलर्ट

या घटनेनंतर सदर मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. झाड हटवण्याचे आणि मार्ग मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना या मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले आहे.

वाऱ्याचा कहर अजूनही सुरू

अकोला शहरात पावसासोबत येणाऱ्या वाऱ्याचा वेग खूपच जास्त असून अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. वीज खंडित होण्याच्या तक्रारीही नागरिकांतून येत आहेत. हवामान खात्याने पुढील 24 तास वादळी वारे व मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!