LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

बडनेरा शहरात वादळी वाऱ्यासह पावसाचा कहर

बडनेरा – राज्यभरात मान्सूनपूर्व पावसामुळे एकच हाहाकार उडाला असताना बडनेरा शहरालाही या नैसर्गिक आपत्तीने जबर फटका दिला आहे. शहरातील नवी वस्ती परिसरातील म्हाडा कॉलनीत एका घराची ४० फूट लांब व ७ फूट उंच आवार भिंत कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

सततधार पावसाने रात्रभर घेतले शहराला वेढा
मंगळवारी सायंकाळी ६ वाजेपासून बडनेरा शहरात गडगडाटासह संततधार पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस रात्री १ वाजेपर्यंत सुरू होता. रात्री ११ ते १ दरम्यान विजेच्या कडकडाटासह अचानक म्हाडा कॉलनीतील भिंत कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो.

सैय्यद कुटुंबाचे मोठे नुकसान
नवी वस्तीमधील सैय्यद कुटुंबाच्या घराच्या परिसरातील ४० फूट लांब भिंत कोसळली. ही भिंत सात फूट उंच होती. प्रखर वीज आणि पावसामुळे ही भिंत कोसळली. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने सुदैवाने कोणतीही प्राणहानी टळली, मात्र सैय्यद कुटुंबाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी
सैय्यद कुटुंबियांनी सांगितले की, “ही नैसर्गिक आपत्ती असून, शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई मंजूर करावी. आम्ही सामान्य कुटुंब असून, इतके नुकसान भरून काढणे अशक्य आहे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!