LIVE STREAM

AkolaLatest News

अकोला जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भात पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

अकोला : अकोला जिल्ह्यात येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका, नगरपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने तयारीला सुरुवात केली आहे. अलीकडेच माजी आमदार एड. नतीकोद्दीन खतीब यांची अकोला जिल्हा निवडणूक समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यानंतर अकोला येथे वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन महिला आघाडी आणि युवक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली.

या बैठकीस एड. नतीकोद्दीन खतीब अध्यक्षस्थानी होते. बैठकीदरम्यान अकोला जिल्ह्यातील विविध तालुके तसेच अकोला महानगर क्षेत्रातील स्थानिक राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने स्थानिक पातळीवरील प्रश्न, सामाजिक समीकरणे, संभाव्य उमेदवार आणि प्रचार रणनीती यावर सखोल चर्चा झाली.

एड. खतीब यांनी पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले आणि त्यांना स्पष्ट निर्देश दिले की, प्रत्येक कार्यकर्ता स्थानिक स्तरावर जनतेच्या समस्या ऐकून घेऊन पक्षाच्या भूमिकेची प्रभावीपणे मांडणी करावी. त्यांनी पुढे सांगितले की, वंचित बहुजन आघाडी ही जनतेच्या प्रश्नांवर आधारित राजकारण करते आणि निवडणुकाही या भूमिकेच्या आधारावरच लढवली जाणार आहे.

प्रतिनिधी – मुकेश ढोके

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!