LIVE STREAM

AkolaLatest News

अकोला पोलिस दलात मोठे फेरबदल! नऊ अधिकाऱ्यांच्या बदल्या

अकोला – राज्यातील पोलिस विभागात नुकत्याच करण्यात आलेल्या बदली प्रक्रियेअंतर्गत अकोला शहरातील नऊ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. या यादीत वाहतूक शाखा प्रमुख सुनील किनगे यांचाही समावेश असून, त्यांच्या बदलीची अधिकृत घोषणा राज्य शासनाने केली आहे.

ही बदली प्रक्रिया राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक डॉ. सुखविंदर सिंह (माजी अकोला जिल्हा पोलिस अधीक्षक) यांच्या सहीने अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आली आहे.

या बदल्यामुळे शहरातील पोलिस यंत्रणेत काही प्रमाणात नव्या जबाबदाऱ्या आणि फेरबदल दिसून येणार आहेत. पोलिस दलातील अंतर्गत कार्यपद्धती अधिक प्रभावी आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने ही बदली प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे, असे सूत्रांकडून समजते.

नव्या बदल्यांनंतर शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर कोणता परिणाम होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!