अकोल्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : जुगार अड्ड्यावर धाड, 6 आरोपी अटकेत, 2 लाखांचा मुद्देमाल जप्त
अकोला : जिल्ह्यातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आलेगाव परिसरातील सक्रिय जुगार अड्ड्यावर धाड टाकली आहे.
या कारवाईत जुगार खेळताना 6 आरोपींना रंगेहात अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे 2 लाख रुपयांचा रोख व जुगार साहित्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही धाड स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळखे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. गेल्या काही दिवसांपासून आलेगाव परिसरात जुगार अड्ड्यांची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळत होती. त्यानंतर योजनाबद्धरीत्या पाळत ठेवून कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी आरोपींविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून आणखी कोणी या जुगार रॅकेटमध्ये सामील आहे का, याचा तपास सुरू आहे.
या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्यांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांची स्तुती केली आहे.
प्रतिनिधी – मुकेश ढोके