LIVE STREAM

Latest NewsMaharashtraSports

खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये विजेतेपदाची हॅट्रिक करणार्‍या महाराष्ट्राच्या संघाचे अभिनंदन!

मुंबई : खेलो इंडिया युवा स्पर्धेमध्ये सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावणाऱ्या महाराष्ट्र संघाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अभिनंदन केले. याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या सन्मानाचा अधिकृत ठराव मंत्रिमंडळासमोर मांडला.

7व्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राने एकूण 158 पदकांची कमाई करत इतिहास रचला आहे. यात 58 सुवर्ण, 47 रौप्य आणि 53 कांस्य पदकांचा समावेश असून, विविध 9 खेळांमध्ये महाराष्ट्राने विक्रमी यश संपादन केले आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या यशाबद्दल गौरवोद्गार काढताना सांगितले, “महाराष्ट्राचे खेळाडू हे देशासाठी अभिमानाची बाब आहेत. या घवघवीत यशाने युवा पिढीला प्रेरणा मिळेल. राज्य शासनाच्या माध्यमातून खेळ क्षेत्राला भक्कम पाठबळ दिले जात आहे आणि हेच त्याचे फळ आहे.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!