Latest NewsMaharashtra
जगीं विठ्ठल रुक्मिणी: संतांची परंपरा राज्यकर्त्यांच्या कृतीतून साकार!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठाच्या संचालिका डॉ. स्वाती मुळे, संचालक ह.भ.प. राजु महाराज ढोरे यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहू यांच्याद्वारे निर्मित जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची पारायण प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली.
यावेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचलित जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठातील सभागृह व संगीत विभागाचे अनावरण, तसेच श्रीक्षेत्र आळंदी जवळील चऱ्होली येथील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने उभारलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीच्या महाशिल्पाचे अनावरण करण्यासंदर्भात चर्चा झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.