LIVE STREAM

Akola

पिंजरमध्ये पुन्हा एकदा चोरी! लग्नासाठी नातेवाईकाकडे गेलेल्या कुटुंबाच्या घरात 3.85 लाखांचा डल्ला

अकोला : अकोला जिल्ह्यातील पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे सत्र काही केल्या थांबत नसल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. पिंजर शहरातील रहिवासी विशाल मोतीराम बुटे हे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकाकडे लग्नसमारंभासाठी गेले होते. मात्र घरी परतल्यानंतर त्यांना धक्कादायक चित्र पाहायला मिळालं.

बुटे यांच्या घरातील लोखंडी अलमारी, बेडरूममधील कपाटे उघडी असल्याचं लक्षात आलं. चोरट्यांनी घरातील सगळं साहित्य उचकून दागिने व रोकड असा मिळून सुमारे 3 लाख 85 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

ही घटना उघडकीस येताच गावात मोठा खळबळ उडाली असून ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. विशेष म्हणजे, गेल्या दीड वर्षांपासून पिंजर पोलिसांच्या हद्दीत एकामागोमाग एक चोरीच्या घटना घडत असतानाही अद्याप एकाही प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेले नाही. ही बाब अत्यंत चिंताजनक असून पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.

विशाल बुटे यांनी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. मात्र, या वारंवार होणाऱ्या चोरीमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण असून नागरिकांनी रात्री गस्त वाढवावी, अशी मागणी पुढे येत आहे.

प्रतिनिधी – मुकेश ढोके

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!