पुणे शहरातील तीन ठिकाणांच्या अतिक्रमण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावे -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई : विधान मंडळ अधिवेशनादरम्यान लक्षवेधीवरील माहिती नुसार पुणे शहरातील कात्रज ,कोंढवा, येवलेवाडी या तीन ठिकाणांच्या अतिक्रमण प्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करावेत. यासाठी पुणे महानगरपालिका व महसूल विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, असे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
मंत्रालयात लक्षवेधीवरील कार्यवाहीच्या अनुषंगाने मंत्री श्री.बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला आमदार योगेश टिळेकर तसेच पुणे महानगरपालिकेचे व पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. मंत्रालयात सहसचिव सत्यनारायण बजाज, सहसचिव अजित देशमुख उपस्थित होते.
महसूल मंत्री श्री बावनकुळे म्हणाले, विधिमंडळ अधिवेशनातील लक्षवेधीवरील सदर प्रकरणी केलेल्या कार्यवाहीची लवकरच प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करणार आहे.