LIVE STREAM

Latest NewsParbhani

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते कृषी विद्यापीठाच्या स्मरणिका व प्रकाशनांचे भव्य विमोचन

परभणी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे विविध स्मरणिका व प्रकाशनांचे विधिवत विमोचन केले. कृषी क्षेत्रातील संशोधन, माहिती आणि नवाचार यांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने हे महत्त्वपूर्ण प्रकाशन सादर करण्यात आले.

यावेळी विमोचन करण्यात आलेली प्रकाशने:
✅ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची स्मरणिका
✅ परभणी विद्यापीठाच्या ५ प्रकाशने
✅ महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांची २० प्रकाशने
✅ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला यांची ६ प्रकाशने

कार्यक्रमाला मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, कुलगुरू वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

या प्रकाशनांमुळे शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी ज्ञान पोहोचण्यास मदत होणार असून, कृषी क्षेत्रातील संशोधनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा आणि फोटो सिटी न्यूज अमरावतीच्या अधिकृत वेबसाइट व सोशल मीडियावर लवकरच उपलब्ध असणार आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!