LIVE STREAM

AmravatiLatest News

राष्ट्रीय अन्नसुरक्षा व पोषण अभियानांतर्गत अन्नधान्य व तेलबिया पिकांसाठी अनुदानावर बियाणे उपलब्ध – शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

अमरावती : राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान अन्नधान्य पिके व वाणिज्यिक पिके आणि राष्ट्रीय खाद्यतेल अभियान-तेलबिया अंतर्गत पिकांची उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्व विचारात घेता सुधारित /संकरीत वाणांचे प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अभियांनांतर्गत अन्नधान्य पिके, वाणिज्यिक पिके व तेलबिया पिकांची शंभर टक्के अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या योजनेचा शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी संचालक र. शा. नाईकवाडी यानी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

या घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रती शेतकरी किमान 0.20 हे. ते कमाल 1 हेक्टरपर्यंत मर्यादित आहे. प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतक-यांना देण्यात येणार असून सोयाबीन, भुईमुग, सुर्यफुल व तीळ या पिकांकरिता १००% अनुदानावर बियाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहे. याकरिता https://mahadbt.maharashtra.gov.in/FarmerAgriLogin/AgriLogin या संकेतस्थळावर “बियाणे वितरण, प्रात्यक्षिक, फ्लेक्सी घटक, औषधे आणि खते” या टाईल अंतर्गत शेतकऱ्यांना अर्ज करता येतील. या घटकाची प्रथम लाभार्थी निवड यादी दि. ३०.०५.२०२५ रोजी जाहीर करण्यात येईल.

तसेच भात, तुर, मुग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, वरई या पिकांकरिता अनुदानावर प्रमाणित बियाणे उपलब्ध आहे. शेतक-यांनी ७/१२ उता-यासह कोणतेही एक ओळखपत्र बियाणे वितरकाला दाखवून अनुदान वजा जाता लोकवाटा भरुन प्रमाणित बियाणाचा लाभ घ्यावा.

प्रमाणित बियाणे घटकास अर्ज सादर करणेसाठी शेतक-यांची Agristack वर नोंदणी असणे बंधनकारक आहे. लाभार्थी निवड प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य (FCFS) या तत्वावर करण्यात येणार आहे. प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ घेणेसाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभघ्यावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!