LIVE STREAM

Latest NewsYavatmal

ट्रॅव्हल्स मधून प्रवाशांच्या 16 किलो चांदीची बॅग चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद.

सराफा व्यापारी हे 16 किलो 800 ग्रॅम चांदी बॅगमध्ये घेऊन ट्रॅव्हल्स ने यवतमाळ वरून तेलंगणा येथे जात असताना चोरट्यांनी चांदी असलेली बॅग लंपास केल्याची घटना घडली होती. दरम्यान या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला गजाआड करीत सात लाख 68 हजार रुपयांची चांदी जप्त केली आहे.

सराफा व्यापारी प्रतीक कोटक हे यवतमाळ वरून तेलंगणा येथे ट्रॅव्हल्स ने चांदी घेऊन जात असताना ट्रॅव्हल्स प्रवाशांना जेवण करता मोहदा येथील धाब्यावर थांबली होती. दरम्यान कोटक हे ट्रॅव्हल्स च्या खाली उतरल्यानंतर चोरट्याने संधी साधत 16 किलो असलेली चांदी घेऊन चार चाकी वाहनाने पसार झाले. दरम्यान कोटक यांनी पांढरकवडा पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तपास चक्र फिरवीत मुस्ताक उर्फ चिल्लू शमशेर खान याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सात लाख 68 हजार रुपये किमतीची चांदी जप्त केली आहे तर दोन आरोपी पसार झाले आहेत पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!