LIVE STREAM

Latest NewsNagpur

महाजनवाडीत एका घरात आढळला विषारी साप

नागपूर : जयस्वाल नगर भागातील पंकज कुवरे यांच्या घरात गुरुवारी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. झोपण्याच्या बेडवर, उशीखाली अतीविषारी नाग जातीचा साप सापडल्याने घरातील सदस्यांची मोठी घाबरगुंडी उडाली. वेळीच सावधगिरी बाळगत त्यांनी विदर्भ सर्पमित्र समितीचे सदस्य आकाश मेश्राम यांना संपर्क केला.

आकाश मेश्राम यांच्यासह अविनाश लोहकरे आणि राहुल सिंग यांनी घटनास्थळी धाव घेत सापाला सुरक्षितपणे पकडले आणि जंगलात सोडून दिले. या धाडसी आणि तत्परतेने केलेल्या कारवाईबद्दल नागरिकांनी सर्पमित्र पथकाचे आभार मानले आहेत.

सावधगिरीचे आवाहन:
सर्पमित्र आकाश मेश्राम यांनी संवाद साधताना सांगितले की, “पावसाळ्यात सापांची हालचाल वाढते. ओलसर जमीन टाळून ते घराच्या उबदार ठिकाणी प्रवेश करतात. त्यामुळे लोकांनी अंथरूण भिंतीलगत न ठेवता मध्यभागी ठेवावे. शक्य असल्यास अंथरुणाखाली मच्छरदाणी दाबून ठेवावी जेणेकरून साप अंथरुणात प्रवेश करू शकणार नाही.”

सर्पदंशाच्या बाबतीत महत्वाचे मार्गदर्शन:
पावसाळ्यात सर्पदंशाचे प्रमाण वाढते. या काळात खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात:
सर्पदंश होताच सरकारी दवाखान्यात तातडीने दाखल व्हावे
प्रायव्हेट रुग्णालयांमध्ये अनेकवेळा ASV (Antisnake Venom) उपलब्ध नसते
उपचारात होणाऱ्या विलंबामुळे जीवितहानी होण्याचा धोका वाढतो

नागरिकांना आवाहन:
पावसाळ्याच्या सुरुवातीलाच अशा घटना गंभीर आहेत. नागरीकांनी सावधगिरी बाळगावी व सर्पदंशासंबंधी चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. अशा प्रसंगी प्रशिक्षित सर्पमित्रांशी त्वरित संपर्क साधावा.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!