LIVE STREAM

AmravatiLatest News

मान्सूनपूर्व तयारीसाठी राणा यांची बैठक; स्मारकाच्या रखडलेल्या कामावर संताप

अमरावती : मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आमदार रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. या बैठकीत शहरात संभाव्य नैसर्गिक आपत्ती – पावसाळी पाणी, पूर, वीज गळती यांसारख्या बाबतीत सर्व संबंधित यंत्रणांनी वेळेत आणि योग्य पद्धतीने खबरदारी घेण्याच्या सूचना आमदारांनी दिल्या.

सर्व विभागीय प्रमुखांची उपस्थिती:
या बैठकीला मनपा आयुक्त सचिन कलंत्री, सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. नालेसफाई, रस्ते डागडुजी, वीज व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन यासह अनेक मुद्द्यांवर नागरिकांच्या तक्रारी व सूचना मांडण्यात आल्या. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यवाही करण्याचे निर्देश आमदारांनी दिले.

स्मारकाच्या कामावर संताप:
बैठकीत बडनेरा येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या रखडलेल्या सौंदर्यकरणाच्या कामावरही चर्चा झाली. या कामाची गती गेल्या दीड वर्षांपासून मंद आहे. या प्रकरणात स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजभिये, सचिव सिद्धार्थ बनसोड, सदस्य मच्छिंद्र भटकर व हितेश मेश्राम यांनी आमदार रवी राणा यांच्याकडे तक्रार सादर केली. सचिव सिद्धार्थ बनसोड यांनी कामाच्या विलंबाचा सविस्तर ईतिहास मांडला.

या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना थेट धारेवर धरत, “काम प्रलंबित ठेवणे खपवून घेतले जाणार नाही. एका महिन्याच्या आत सौंदर्यकरणाचे काम पूर्ण करावे,” असा कडक इशारा दिला.

सिटी न्यूजने सतत घेतला पाठपुरावा:
स्मारकाच्या कामासाठी City News Amravati ने वारंवार बातम्यांच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. काही प्रमाणात कामाला गती मिळाली होती, मात्र नंतर पुन्हा दुर्लक्ष झाल्याचे दिसून आले. आता आमदारांनी दिलेला अल्टिमेटम प्रभावी ठरणार का, हे येत्या महिन्यात स्पष्ट होईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!