LIVE STREAM

Latest NewsSolapur

मित्राचे आईसोबत अनैतिक संबंध, विकासने दळण आणायला गेलेल्या मित्राला संपवलं, सोलापूर हादरलं

आईशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून सोलापूरमध्ये एका तरुणाने त्याचा मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोहोळ तालुक्यातील सौंदणे गावात ही घटना घडली. नेताजी तानाजी नामदे असे मृत तरुणाचे नाव आहे. विकास मारुती गुरव या त्याच्या मित्रानेच त्याचा खून केला. विकास गुरव याला नेताजी नामदे याचे आपल्या आपल्या आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे विकासच्या डोक्यात राग धुमसत होता. याचे पर्यवसान नेताजीच्या हत्येत झाले.

नेताजी नामदे हा घरातून 24 मे पासून बेपत्ता होता. तो दळण आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. मात्र, घरी परतलाच नव्हता. त्यामुळे नेताजीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी नेताजी नामदे याचा शोध घ्यायला सुरुवात केली होती. तपासादरम्यान चार ते पाच दिवसांनी पोलिसांना त्याच्या व्हॉटसअॅपवरील माहिती मिळाली. व्हॉटसअॅप चॅटवरुन पोलिसांना विकास गुरव याचा संशय आला. पोलिसांनी विकासला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली. पोलीसी खाक्या दाखवताच विकासने नेताजीची हत्या केल्याची कबुली दिली.

नेताजी याचे आपल्या आईशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आपल्याला वाटत होता, असे विकासने पोलिसांना सांगितले. त्यामुळेच आपण नेताजीही हत्या केली. त्यानंतर नेताजीचा मृतदेह शेतात नेऊन पुरला असे, विकासने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी विकासला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याल 2 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!