LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

मोर्शीतील वाईन शॉप आणि बारमध्ये मध्यरात्री चोरी – चोरटे सीसीटीव्हीत कैद

आज पहाटे सुमारे 1.45 वाजण्याच्या सुमारास मोर्शी शहरातील जयस्तंभ चौकाजवळील प्रेम वाईन शॉप आणि तेथून अवघ्या 100 ते 150 मीटर अंतरावर असलेल्या श्रद्धा बार अ‍ॅण्ड रेस्टॉरंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी करून पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे.

विशेष म्हणजे, ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे कैद झाली असून चोरट्यांचे हावभाव व चेहेरे फुटेजमध्ये दिसून येत आहेत. या प्रकारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मोर्शीमध्ये वाढती चोरीची मालिका:
गेल्या काही महिन्यांपासून मोर्शी शहरात चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून पोलीस प्रशासनाचे नियंत्रण व गस्त व्यवस्था यावर नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
विशेषतः जयस्तंभ चौकासारख्या मध्यवर्ती व वर्दळीच्या परिसरात वारंवार चोऱ्या होणे, हे पोलीस यंत्रणेसमोरील मोठे आव्हान ठरत आहे.

सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे:
चोरीच्या ठिकाणी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून चोरटे स्पष्टपणे फुटेजमध्ये दिसून येत आहेत. मोर्शी पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत.

स्थानिकांचा संताप:
या घटनांनंतर परिसरातील नागरिक आणि व्यावसायिकांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर नाराजी व्यक्त केली आहे. “वारंवार होणाऱ्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी तातडीने कडक पावले उचलावीत” अशी मागणी करण्यात येत आहे.

पोलिसांकडून तपास सुरू:
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. लवकरच चोरट्यांना अटक केली जाईल, असा विश्वास पोलीस सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!