रामपुरी कॅम्प मध्ये लाखोंच्या गुटख्यावर छापा, शहर गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती : नवीन पोलीस आयुक्त डॉ. अमितेश चावरिया यांच्या कार्यकाळाची धडक सुरुवातच अवैध धंद्यांवर हल्ला करत झाली आहे. रामपुरी कॅम्प परिसरात शहर गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत एका घरात लपवलेला कोट्यवधी रुपयांचा गुटखा साठा उघडकीस आणला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्तांच्या थेट मार्गदर्शनाखाली गुरुवारी (दि. ३० मे) रोजी पार पडली. एका घराच्या अंगणात गुटख्याने भरलेली पोती आढळून आली. मात्र या कारवाईदरम्यान प्रसारमाध्यमांना घटनास्थळी प्रवेश नाकारण्यात आला, ज्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले.
घराच्या आंगणात साठवलेला गुटखा:
कारवाई दरम्यान घराच्या अंगणात अवैध गुटख्याची पोत्यांची राशी सापडली. गुन्हे शाखेने संपूर्ण साठा जप्त करत प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणात घरमालक व अन्य संबंधितांविरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.