LIVE STREAM

AmravatiLatest News

अमरावतीत अनधिकृत मोबाईल टॉवरविरोधात आमदार रवी राणांच्या आढावा बैठकीत कठोर सूचना

बडनेरा : मान्सूनपूर्वकाळातील नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याच्या दृष्टीने अमरावती महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आमदार रवी राणांच्या अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त सचिन कलंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत बडनेरा येथील अलंकार पार्कमधील अनधिकृत मोबाईल टॉवर काढून टाकण्याचे तडका फडकी आदेश आमदार रवी राणांनी दिले.

बडनेर्यात अनधिकृत टॉवर उभारणीने नागरिकांमध्ये मोठा विरोध
बडनेरा नवी वस्ती परिसरातील अलंकार पार्क व शारदा नगर ही उच्चभ्रू, नोकरीपेशा नागरिकांची वस्ती आहे. या परिसरात एका घरावर अनधिकृतपणे दोन टॉवर उभारण्याचे काम सुरू आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी मनपाकडे अनेकदा तक्रारी केल्या असून, मनपाने टॉवर बांधणी थांबवण्याचे आदेशही दिले आहेत. मात्र, या आदेशाला पाळून टॉवरचे काम थांबत नसल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.

आमदार रवी राणांनी संबंधित अधिकाऱ्यांना काढले चांगले खडे
नागरिकांनी थेट आमदार रवी राणांच्या आढावा बैठकीत धाव घेऊन टॉवर उभारणी थांबवण्याची मागणी केली. या बैठकीत आमदार राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तडजोड न करता कडक इशारा दिला. मनपा झोन क्रमांक चारचे उपअभियंता श्रीरंग तायडे यांनी आठ दिवसांत बांधकाम थांबवण्याच्या नोटीस दिल्या होत्या. मात्र काम सुरूच असल्याने आमदारांनी तात्काळ अनधिकृत टॉवर हटवण्याचे आदेश दिले.

अनधिकृत टॉवर मालकावर गॅस रिफिलिंगचा आरोपही
शिवाय टॉवर मालकाच्या घरी अनधिकृत गॅस रिफिलिंग होत असल्याची तक्रारही आढावा बैठकीत मांडण्यात आली, ज्यावर आमदार राणा यांनी त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले.

परिसरातील नागरिकांच्या प्रतिक्रिया व पुढील अपेक्षा
अलंकार पार्क व शारदा नगरमधील महिला-पुरुष नागरिक मोठ्या संख्येने या बैठकीत उपस्थित होते. आता आढावा बैठकीत दिलेल्या आदेशांचे पालन होईल की नाही, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे, कारण अनेकदा अशा बैठका फक्त औपचारिकता म्हणून संपतात.

बडनेरा प्रतिनिधी: मच्छिंद्र भटकर

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!