पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जन्मोत्सव सोहळा चांदुरबाजारात प्रहार पक्षाच्यावतीने साजरा
चांदुरबाजार : भारतीय इतिहासातील तेजस्वी, कर्तबगार व दूरदृष्टी असणाऱ्या स्त्रीशक्तीचे प्रतीक असलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त चांदुरबाजार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. या वेळी मोठ्या संख्येने प्रहार कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
या त्रिशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र, मध्यप्रदेश व देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. चांदुरबाजारातील कार्यक्रमातही नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
या सोहळ्याला माजी मंत्री बच्चू कडू, शिरजगाव बंडच्या सरपंच वाकोडे मॅडम, प्रहार तालुका अध्यक्ष संतोष कीटूकले, मंगेश देशमुख, विनोद कोरडे, दीपक भोगाडे, माजी नगरसेवक मुजफ्फर हुसेन, सचिन खुळे, निलेश वाटणे, गजानन ठाकरे, शिशिर माकोडे, प्रवीण तडस, विशाल आवारे, प्रशांत देवताडे आदी प्रहार पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या न्यायनिष्ठ व धर्मनिष्ठ राज्यकारभाराचे स्मरण करत समाज प्रबोधनाचा संदेश देण्याचे कार्य या निमित्ताने करण्यात आले.