LIVE STREAM

Amaravti GraminLatest News

भातकुली तालुक्यात जनावर चोरांची टोळी सक्रिय, ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

भातकुली ; भातकुली तालुक्यातील वंडली गावात जनावर चोरांची टोळी सक्रिय झाली असून गेल्या काही दिवसांत १५ हून अधिक जनावरे चोरीला गेली आहेत. या सलग होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

काल रात्रीची घटना विशेष लक्षवेधी ठरली. गावातील पोलिस पाटील कैलास औगड यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरी स्पष्टपणे कैद झाली आहे. फुटेजमध्ये चोरटे चारचाकी वाहनातून जनावरे चोरून नेताना दिसून येतात. या धक्कादायक फुटेजमुळे पोलीस प्रशासनावर कारवाईचा दबाव वाढला आहे.

सध्या पेरणीपूर्व काळ सुरू असल्याने शेतकऱ्यांसाठी बैल व इतर जनावरे अत्यावश्यक आहेत. मात्र अशा चोऱ्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी पोलिस प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. गावांमध्ये गस्त वाढवणे, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींचा शोध घेणे, याची मागणी जोर धरू लागली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!