AmravatiLatest News
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

अमरावती – पुण्यश्लोक लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात साजरी करण्यात आली. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण करुन विद्यापीठाच्यावतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, नवोपक्रम, नवसंशोधन व साहचर्य मंडळाचे संचालक डॉ. अजय लाड, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत पाटील, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर, उपकुलसचिव डॉ. सुलभा पाटील, डॉ. दादाराव चव्हाण, सहा. कुलसचिव श्री अनिल मेश्राम, डॉ. दुर्गे तसेच विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी व महिला कर्मचारी उपस्थित होते. संचालन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास नांदुरकर यांनी दिली.