LIVE STREAM

Latest NewsNagpur

सर्वसामान्यांना परिपूर्ण वैद्यकीय सुविधेसाठी शासनामार्फत विविध सुविधांवर भर – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 

नागपूर : सर्वसामान्य जनतेला परिपूर्ण वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी शासनामार्फत विविध सेवा सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिल्या जात आहे. नागपूर मधील विविध शासकीय रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण वैद्यकीय सुविधांचे अनेक प्रकल्प हाती घेतले असून शासकीय दंत रुग्णालयातील ही अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहाची अर्थात मॉड्युलर ऑपरेशन थिएटरची राज्यातील पहिली उपलब्धी असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

येथील शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या अत्याधुनिक शस्त्रक्रीया गृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अर्थ राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागीय संचालक डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता डॉ. अभय दातारकर, विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पंदीलवार आदी उपस्थित होते.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!