LIVE STREAM

Crime NewsLatest News

Crime News : दररोज रात्री आईला द्यायची झोपेच्या गोळ्या, नंतर रात्रभर प्रियकराशी…; 15 वर्षीय मुलीच्या भयंकर कृत्याने खळबळ

Crime News : कृष्णानगर, लखनऊ येथे घडलेली एक धक्कादायक घटना सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. केवळ 15 वर्षांच्या एका मुलीने तिच्या आईला सलग तीन महिने झोपेच्या गोळ्या दिल्या. आई गाढ झोपली की, स्वतःच्या प्रियकराशी बोलण्यासाठी किंवा त्याला भेटण्यासाठी मुलगी रात्री घरातून बाहेर पडायची. ही गोष्ट तेव्हा उघडकीस आली, जेव्हा आईची तब्येत सतत बिघडत गेली आणि वैद्यकीय तपासणीत तिच्या शरीरात झोपेच्या औषधाचं प्रमाण अधिक असल्याचं निदान झालं. चौकशीत मुलीने कबूल केलं की, ती दररोज आईच्या जेवणात तीन ते चार झोपेच्या गोळ्या मिसळायची.

या प्रकरणाचा सखोल तपास करत असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुलीकडे एक विषाची बाटली सापडली होती, जी तिला तिच्या प्रियकराने दिली होती. तिने कबुली दिली की, तिने आपल्या आईला ठार मारण्याचा कट रचला होता. पण, अखेर ती योजना रद्द करत केवळ झोपेच्या गोळ्यांपुरतीच मर्यादित राहिली. मुलीच्या या धोकादायक वर्तनामागे तिचा प्रियकराशी असलेला भावनिक गुंता आणि आईशी नसलेला संवाद हे मुख्य कारण असल्याचं स्पष्ट झालं आहे. सध्या त्या मुलीला समुपदेशनासाठी पाठवण्यात आले असून एका निवारागृहात ठेवण्यात आले आहे.

प्रियकराशी संपर्क साधण्यासाठी आईला दिल्या झोपेच्या गोळ्या
दरम्यान, सध्या किशोरवयीन मुलं आणि पालकांमधील नातं अधिकाधिक ताणलेलं आणि दूर गेलेलं दिसत आहे. किशोरवय हा अत्यंत संवेदनशील टप्पा असतो. या वयात मुलांना स्वातंत्र्याची गरज असते. पण, त्याच वेळी ते भावनिकदृष्ट्या असुरक्षित आणि सहज प्रभावित होणारे असतात. अशा वयात ते चुकीच्या संगतीकडे वळू शकतात किंवा सोशल मीडियाच्या आहारी जाऊ शकतात. लखनऊमध्ये घडलेली धक्कादायक घटना याचं ताजं उदाहरण आहे. एका 15 वर्षांच्या मुलीने आपल्या आईला झोपेच्या गोळ्या देऊन तिच्या प्रियकराशी संपर्क साधण्यासाठी रात्री घराबाहेर जाण्याचा मार्ग निवडला. तिच्या या टोकाच्या कृतीमागे तिच्या प्रियकराने दिलेला चुकीचा सल्ला आणि मुलीचं त्याच्यावरील भावनिक आकर्षण हे कारणीभूत ठरलं.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!