LIVE STREAM

Crime NewsLatest News

Mumbai: भयानक! लैंगिक संबंधांना नकार दिल्यानं पत्नीला जिवंत जाळलं; चेंबूर येथील घटना

मुंबईतील चेंबूर परिसरात शुक्रवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. पत्नीने लैंगिक संबंधांना नकार दिला म्हणून तिच्या पतीने तिला जिवंत जाळले. या घटनेत महिला गंभीर भाजली. तिच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला घरकाम करते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी ती कामावर जाण्यासाठी तयार होत असताना आरोपीने लैंगिक संबंध ठेवण्याचा आग्रह धरला. परंतु, तिने कामावर जायला उशीर झाल्याचे कारण देत नकार दिला. मात्र, यामुळे संतापलेल्या आरोपीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

या दोघांमधील वाद इतका वाढला की, पीडिताने रागाच्या भरात स्वतःवर रॉकेल ओतले आणि काडीने स्वतःला पेटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती यशस्वी झाला नाही. त्याचक्षणी आरोपीने स्वयंपाकघरात चालू असलेल्या गॅस स्टोव्हच्या वापर करून कागदाचा तुकडा पेटवला आणि तिच्या अंगावर फेकला. या घटनेत पीडिता गंभीर भाजली. या घटनेत पीडिताच्या छातीला, पोटला, पाय आणि हाताला मोठी इजा झाली. तिला ताबडतोब सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा जबाब नोंदवण्यात आला. तिच्या पतीनेच तिला जाणूनबुजून पेटवून दिल्याचे तिने पोलिसांना सांगितला. पीडिताच्या तक्रारीच्या आधारे आरसीएफ पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या कलम १०९(१), ३५२ आणि ११५(२) अंतर्गत आरोपीविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. या घटनेचा तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!