LIVE STREAM

AmravatiLatest NewsSports

अमरावतीचे १२ धावपटू जगातील सर्वात कठीण ‘कॉमरेड मॅरेथॉन’साठी सज्ज!

अमरावती : दक्षिण आफ्रिकेत ८ जून रोजी होणाऱ्या जगातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या ९० किलोमीटरच्या ‘कॉमरेड मॅरेथॉन’ मध्ये यंदा अमरावती शहरातील १२ धावपटू पहिल्यांदाच सहभाग घेणार आहेत. ही महाराष्ट्रासाठीच नव्हे तर अमरावतीसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.

या सर्व धावपटूंना मार्गदर्शन करीत आहेत अमरावती मॅरेथॉनचे जनक आणि सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त दिलीप पाटील, जे स्वतः या प्रतिष्ठित स्पर्धेत १० वेळा धावून विक्रम प्रस्थापित केले आहेत. त्यांच्या निःशुल्क प्रशिक्षणाखाली हे सर्व धावपटू गेल्या काही महिन्यांपासून कठोर सराव करत आहेत.

साउथ आफ्रिकेत ८ जूनला सामना होणार ९० किमी धावण्याचा!
कॉमरेड मॅरेथॉन ही एक अपडाउन रूटवर आधारित जागतिक दर्जाची स्पर्धा आहे, जिथे धावपटूंना केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक क्षमतांचाही कस लागतो. यावर्षी संपूर्ण भारतातून ४१५ धावपटू सहभागी होत असून त्यात अमरावतीच्या १२ जणांचा समावेश विशेष ठरणार आहे.

२ जूनला प्रस्थान – १ जूनला ‘बेस्ट लक रन’
या १२ धावपटूंना २ जून रोजी दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने प्रस्थान करायचे आहे. याआधी १ जून रोजी रविवारी सकाळी ६ वाजता ‘बेस्ट लक रन’ चे आयोजन करण्यात आले. नेहरू स्टेडियमपासून सुरुवात होऊन गर्ल्स हायस्कूल चौक, इरविन चौक मार्गे पुन्हा जिल्हा स्टेडियम येथे धाव समाप्त झाली. यामध्ये सर्व सहभागी धावपटूंनी उत्साहाने सहभाग घेतला.

पहिल्यांदा सहभागी होणारे धावपटू:
प्रमोद राठोड
सागर धनोडकर
प्रणिता पाटील
रितू तलमले
ऋतुजा फुके
अनिल कांबळे
संजय पाटील
संजय अंबाडेकर

याआधी अनुभव असलेल्या धावपटूंची यादी:
दिलीप पाटील – 10 वेळा
मंगेश पाटील – 2 वेळा
सतीश उमरे – 2 वेळा
राजेश कोचे – 2 वेळा

गौरवशाली इतिहास:
या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा अनुभव याआधी देखील नागपूर पोलिसांचे वरिष्ठ निरीक्षक अनिल कुरळकर, म्हाडाच्या उपअभियंता दीपमाला बद्रे यांसारख्या मान्यवरांनी घेतलेला आहे. आता अमरावती शहरातील नव्या पिढीचे १२ धावपटू त्यांच्या पावलांवर पाऊल टाकत जागतिक व्यासपीठावर झेप घेण्यास सज्ज झाले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!